एकोणीसाव्या शतकात झालेली औद्योगिक
क्रांती आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती यावर गंभीरपणे
सामाजिक,आर्थिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी करण्याचे श्रेय
मार्क्सकडे जाते. मार्क्स
च्या विचारांचा प्रभाव सिंध्दात आणि व्यवहार म्हणून अनेकांवर पडला आहे.
त्यामुळे समाजवादाला न स्वीकारता काहींनी त्याची भांडवलशाहीची चिकित्सा
स्विकारली आहे. काहींनी भौतिकवाद स्विकारला पण संघर्ष नाकारला. काहींनी
त्यातून कल्याणकारी राज्यव्यवस्था स्विकारली. जगभरात मार्क्सवादी व्यक्ती
व्यतिरीक्त सुद्धा अनेकांनी मार्क्सच्या काही गोष्टी घेवुन मांडणी करण्याचा
प्रयत्न झाला आहे. मार्क्सवाद
जग समजून घेण्याची दृष्टी आहे. एक पध्दतीशास्त्र आहे म्हणूनच मार्क्सला
किंवा मार्क्सवाद्यांना जसे वाटेल तसेच इतिहासात घडेल किंवा घडते अशी
अपेक्षा बाळगणे हे निव्वळ अनैतिहासिक ठरेल.
जागतिक
घडामोडींवर मार्क्सचा आणि मार्क्सवादाचा काय परिणाम झाला आणि मार्क्स व
मार्क्सवादावर जागतिक घडामोडींचा काय परिणाम झाला हे समजून घेतल्याशिवाय
मार्क्स आणि मार्क्सवादाचे योगदान काय आहे हे सांगता येत नाही. मार्क्सपासून
मार्क्सवाद सुरू होतो पण त्याच्याजवळ थांबत नाही. चीन आणि रशियामध्ये
क्रांतीत्योत्तर रशियात 'वेगळे वर्ग' कसे निर्माण झाले. तसेच सोविएट हे
समाजवादी नसून 'स्टेट नियंत्रित कॅपिटलीस्ट राज्य' आहे असे सुद्धा काही
मार्क्सवादी लोकांनी लिहले आहे. क्रांतीत्योत्तर
समाजवादी चीनमध्ये समाजवादी माणूस घडविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांचे
यश आणि अपयश हे पुन्हा आपणास पाहता येईल. पण, सांस्कृतिक क्रांती ही जागतिक
इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना आहे. चीनी सांस्कृतिक क्रांतीचा जगभर
प्रभाव पडलेला दिसतो. मार्क्सनंतरच्या
काळात तंत्र आणि विज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल झालेले आहेत. 'व्यापारी
भांडवल' हे 'वसाहतवाद' आणि 'साम्राज्यवादा'च्या माध्यमातून 'जागतिक
भांडवल' झाले. त्यामुळेच जागतिक बाजार आणि आर्थिक उत्पादने हे
भांडवलशाहीशी जोडली गेली होती.
समकालीन
वर्तमानात Virtual, Spiritual भांडवल अशा वेगळ्या प्रकारच्या भांडवलाची
निर्मिती झालेली दिसते. त्यातून मार्क्सच्या काळात नसलेला उपभोगवाद सुद्धा
जन्माला आला आहे. हे सगळं मार्क्सला माहिती नव्हते किंवा तो चुकला असे
म्हणणे त्यावर अन्याय करणारे ठरेल. कारण, मार्क्सला सुध्दा विशिष्ट
काळाच्या मर्यादा होत्या. त्या काळामध्ये अस्तित्वात नसलेल्या गोष्टींविषयी
तो कसा बोलेल? म्हणून तात्विक चर्चापेक्षा ऐतिहासिक परिप्रेक्षात त्याचे
मुल्यांकन होणे गरजेचे आहे. शेवटी,
मार्क्स चे काही कोटेशन घेवुन चर्चा करण्यापेक्षा हे चित्र बदलणे महत्वाचे
आहे. मार्क्स आणि मार्क्सवाद्यांनी वापरेल्या संकल्पना सुद्धा इतिहास
टप्यावर समजून घ्यायला हवे. अन्यथा मार्क्स हा हुकुमशाहीचा समर्थक होता आणि
समतेविषयी काहीच म्हटला नाही असा तर्कटपणा आपण लावत बसू! पार्टी
मार्क्सवादी, अभ्यासक मार्क्सवादी, स्वतंत्र मार्क्सवादी आणि सोई सोईचे
मार्क्सवादी विशिष्ट मुद्यांना प्राधान्यक्रम देवून काम करत असतात.
व्यवहारामुळे
त्यांच्यात काहीवेळा विरोधाभास सुद्धा निर्माण होतं असतो. त्यालाच काहीजन
वास्तव समजून घेतात आणि वैचारिक गोंधळ करून घेतात. मार्क्सवादाला निकालात
काढू पाहतात. भांडवलशाहीतील अंतर्विरोध जोपर्यंत आहेत, सामाजिक-आर्थिक
विषमता जोपर्यंत आहे आणि मानव्यहनन जोपर्यंत आहेत तोपर्यंत मार्क्स
आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात भेटतच राहणार असे माझे निरिक्षण आहे.
२ टिप्पण्या:
1. मार्क्सने मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून भांडवलशाहीची चिकित्सा केली आहे असे जे तू म्हणत आहेस त्यावर थोडे स्पष्टीकरण हवे आहे.
2. काहींनी मार्क्सच्या मांडणीतून 'कल्याणकारी राज्या"बाबतचे विचार घेतले आहेत, याविषयीही थोडे स्पष्टीकरण केलंस तर बरे होईल.
3. व्हर्च्युअल आणि स्पिरिच्युअल भांडवल याबाबत थोडी माहिती दे.
1. मार्क्सने मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून भांडवलशाहीची चिकित्सा केली आहे असे जे तू म्हणत आहेस त्यावर थोडे स्पष्टीकरण हवे आहे.
2. काहींनी मार्क्सच्या मांडणीतून 'कल्याणकारी राज्या"बाबतचे विचार घेतले आहेत, याविषयीही थोडे स्पष्टीकरण केलंस तर बरे होईल.
3. व्हर्च्युअल आणि स्पिरिच्युअल भांडवल याविषयी माहिती दिलीस तर बरे होईल.
टिप्पणी पोस्ट करा