जमातवादीकरण संदर्भातील जुनी फेसबुक पोस्ट!
१८ एप्रिल २०१८
१८ एप्रिल २०१८
करीना कपूरसंदर्भात कालपरवा एका भ्रमिष्ट व्यक्तीने जी पोस्ट केली होती.
त्याचा खूपच मोठा संदर्भ आहे हे विसरू नये. बहुतेकवेळा लोकांकडून कोणतीही
गोष्ट, घटना खूपच सुटीसुटी पाहीली जाते. त्यामुळे भ्रमिष्ट लोक जे विद्वेष,
तिरस्कार पसरवत आहेत ते आपणास स्पष्टपणे कळत नाही. याला मी इतिहास अनास्था
असे म्हणतो.
करीना कपूरही आधीपासूनच हिंदुत्ववादी लोकांच्या
प्रपोगंडाची, द्वेषाची, तिरस्काराची बळी ठरली आहे कारण तिने तथाकथित
हिंदुत्वाची चौकट मोडली आहे.
१) करीना कपूरने ज्यावेळी सैफसोबत
लग्न केले होते. तेंव्हा हिंदुत्ववादी लोकांनी त्याला लवजिहाद म्हटत
त्यासंदर्भात सोशल मिडीयावर घाणेरडे मेसेज, कुचाळक्या, अफवा फिरवल्या
होत्या. त्यामुळे सैफ ने इंडियन एक्स्प्रेस मध्ये स्वतंत्र लेख लिहिला
होता. हिंदुत्ववाद्यांना आंतरजातीय -आंतरधर्मीय विवाह झालेले पाहवत नाही.
हल्ली, लोक जातीयवादी असल्याचा आरोप करतात म्हणून काही आंतरजातीय विवाह
झाले आहेत पण त्यातही दोन्ही लोक हिंदुत्ववादी आणि भटाळलेले असावे असे
गृहीत असते.
२) करीना-सैफ यांनी नुकतेच जन्माला आलेल्या बाळाचे नाव
‘तैमुर’ ठेवल्यामुळे तैमुरलंगच्या ‘तथाकथित रक्तरंजित’ इतिहासाचे
ब्लॉगच्या ब्लॉग लिहिले होते. तैमुर नाव ठेवल्यामुळे ते नुकतेच जन्माला
आलेले बाळ भविष्यात दहशतवादी कसे होईल इथपासून ते तैमुर नाव असल्याने
जन्मत: बाळ कसे पाकिस्थानी, अराष्ट्रीय झाले अशाही भविष्यवाण्या अनेकांनी
केल्या होत्या. तैमुरलंग ने कसा हिंदू धर्मविध्वंस केला अशा अनेक अफवा,
कुचाळक्या, द्वेष पसरवणारे मेसेज तेंव्हा पसरवण्यात आले होते.
आता,
३) करीनाने असिफाच्या प्रकरणात निषेधाचा आवाज बुलंद करताच. हिंदुत्ववाद्यांनी करीनाला टार्गेट केले. करीनाला टार्गेट करण्यामध्ये वरील दोन कारणे सुद्धा आहेत.
टीप-आता ज्या लोकांनी करीनाच्या संदर्भात
घाणरडे मेसेज केलेत, त्या लोकांची पर्सनल हिस्ट्री काढली किंवा त्यांचे
फेसबुक हिस्ट्री शोधली तर त्यांनी करीना-सैफ लग्नाच्यावेळी, तैमुरच्यावेळी
काहीना काही आक्षेपार्य पोस्ट केलेली दिसेल किंवा काही कुचाळक्या, कंड्या
पिकवल्या दिसतील आणि अफवा पसरवलेल्या दिसतील. हे व्यापक जमातवादाची
प्रक्रिया आहे. अशा अनेक गोष्टी करून लोकांच्या दैनंदिन आयुष्याचे जमातवादीकरण केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा