वैश्विक
भविष्य चिंतन- १
केंद्रीकरणातून नियंत्रण
नकोय, लोकशाहीकरणातून (विकेंद्रीकरण) व्यवस्थापन पाहिजे!
सरकारी संस्थांचे अतिरेकी केंद्रीकरण झालेले
असल्यामुळे स्थानिक संस्था,
रचना आणि प्रशासन व्यवस्था यांना नेहमी वर पाहावे लागते. त्यामुळेच
अनेक गोंधळ होतात.
कुठलाही निर्णय घेतांना केंद्रीय सत्ता स्थानिक
आणि प्रांतिक लोकांशी सल्ला मसलत करत नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडत जाते.
स्थानिक आणि प्रांतिक रचना आणि संस्थांना अधिक बळकट करायला हवे. त्यांना अधिक
निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात यावे.
स्वायत्तता, विकेंद्रीकरणातूनच
जनतेचे सामाजिक-आर्थिक व्यवस्थापन करता येते. त्यातून लोकांशी संवाद साधता येतो.
लोकांचे दु:ख समजून घेता येते म्हणूनच आपल्या केंद्रीकरणाच्या माध्यमातून वरून
नियंत्रण नकोय तर विकेंद्रीकरणातून खालून व्यवस्थापन पाहिजे. तरच, प्रश्न सुटतील!
वैश्विक
भविष्य चिंतन: २
अमेरिका आणि जागतिक आरोग्य
संघटनेच्या सध्याच्या संबंधातून पुढील काळात काय होवू शकते याची कल्पना आपण करू
शकतो.
जोपर्यंत जागतिक संघटना ( मग
ती जागतिक आरोग्य संघटना असो किंवा जागतिक बैंक असो किंवा जागतिक कामगार संघटना
असो) अमेरिकन हितसंबंध जोपासतील तोपर्यंतच अमेरिका त्यांना मदत करेल. यामुळेच
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने संपूर्ण जगावर आपली आर्थिक दहशत बसवली होती.
जागतिक सत्तासंबध बदल्यामुळे
जागतिक संस्था आणि संघटनांचे स्वरूपही बदलत आहे. त्यामुळे जागतिक संस्था आणि
संघटशांचे वैश्विक लोकशाहीकरण झाले पाहिजे. अमेरिका किंवा चीनची मक्तेदारी त्यावर
असू नये.
भविष्यातील प्रश्न वैश्विक
असतील त्यामुळे जागतिक जाळे आणि संबध पक्के आणि पारदर्शक असण्याची गरज आहे.
त्यामुळे नविन जागतिक संघटनांची कोरोनांतर गरज पडणार आहेच.
वैश्विक
भविष्य चिंतन: ३
कोरोनाचे वर्गीय चरित्र !
१) तुमची रोगप्रतिकारक शक्ती
प्रबळ असेल तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता कमी किंवा झाला तरी तुमचा त्यामुळे
जीव जाऊ शकत नाही. तुमची
रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी औषधी मिळतात. औषधी विकत घेवून रोगप्रतिकारशक्ती
वाढवणे कोणास शक्य आहे?
आणि कोणाला नाही.
अन्नधान्य घेण्यासाठी
ज्यांच्या कडे पैसे नाहीत ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधी विकत घेवू शकतील
का? काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध घराण्यातील लोकप्रतिनिधी
असलेली मुलगी वडीलांकडून रोगप्रतिकारशक्ती वाढण्याच्या गोळ्या घेत होती. दुसरीकडे
लोक मरण्याचा निर्देशांक वाढत आहे.
२) लॉकडाऊन सुरू झाल्यापासून देशभरातील स्थलांतरित
मजूर देशोधडीला लागला आहे. अनेकांनी शेकडो मैलांचा प्रवास पायी केला. त्यामुळे
काही लोक रस्त्यावर मेले,
काही घरी जावून मेले. अनेक ठिकाणी मजूरांना पोलीसांनी मारझोड केली.
पण, तरीही कुठल्याच प्रकारची प्रवासाची सोय त्यांच्यासाठी
केली नाही.
कामगार म्हणून काम करणारे
अठरा, एकोणीस वर्षांची मुले डसाडसा रडतांना अनेक व्हिडीओ सार्वजनिक झाले आहेत. पण,
तरीही कोणालाही काळजी वाटली नाही. पण, ज्यावेळी
श्रीमंताची मुले कोटा शहरात अडकली म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रवासाची सोय
करण्यात आली.
कोटा येथे कोणीही कोचींग
करायला जात नाही. पैसा असलेली गर्भश्रीमंत,
श्रीमंत आणि सधन लोकांचीच मुले तिकडे जातात. गरिबांना वाऱ्यावर
सोडणारे सरकार श्रीमंतांसाठी सगळ्या गोष्टी करतांना दिसत आहे. जात, धर्म अशा द्वेषाणूंपासून मजूरांनी, कामगारांनी,
कष्टकरी जनतेने लांब रहायला हवे. तरच, कोरोनाच्या
विषाणू पासून वाचू.
वैश्विक भविष्य
चिंतन: ४
विसाव्या जगभरात
डाव्या-उजव्या लोकांनी केलेल्या सामाजिक,
आर्थिक आणि राजकीय केंद्रीकरणातून प्रश्न सुटले नाहीत हाच इतिहासाचा
धडा. डाव्या- उजव्या एकाधिकारशाहींनी केंद्रीकरण करून सर्व सत्ता ताब्यात ठेवली.
जोपर्यंत एकाधिकारशाही अस्तित्वात होती तोपर्यंतच केंद्रीकरणाची स्थिती टिकली.
नंतर अनेक गोष्टी कोसळल्या मग, तो जर्मन फासिझम असो, रशियन सोशिलिझम असो!
भांडवलशाहीचा
संपूर्ण जगात साम्राज्यवादाद्वारे प्रसार झाल्यामुळे संपूर्ण जगाचे आर्थिक
केंद्रीकरण होवू लागले. आज मात्र जगभरात भांडवलशाहीचे
संकट निर्माण झालेले आहे. निसर्ग, पर्यावरणाचे
भांडवली नफ्यासाठी विध्वंस करून सगळी भांडवली आर्थिक व्यवस्था टिकवून धरणे कठीण
झाले आहे.
विकासाच्या नावाखाली होणारे निसर्ग आणि पर्यावरण
विरोधी आधुनिकीकरण हे भांडवली केंद्रीकरणाचाच भाग आहे. विसाव्या शतकात
आधुनिकीकरणाच्या नावाखाली भरमसाठ हाणी झाली आहे. त्यामुळेच, राष्ट्रीयीकरण,
सार्वजनिकीकरण करतांना संपूर्ण व्यवस्थेचे केंद्रीकरण होणार नाही
ह्याची काळजी घेतली पाहिजे. विसाव्या शतकात राष्ट्रीयीकरण, सार्वजनिकीकरण
ह्या नावाखाली केंद्रीकरणच झाले त्यामुळे भांडवलशाहीला फायदा झालेला आहे. एकविसाव्या
शतकात नव्या गोष्टी शोधाव्या लागतील. डाव्या-उजव्या लोकरंजनुवादापासून फारकत घेतली
पाहिजे.
माणूस,
समाज आणि निसर्ग ह्यांच्यात सततची आंतरक्रिया चालू असते. ती चालू
ठेवण्यासाठी स्वायत्तता, विकेंद्रीकरण, सामाजिक- आर्थिक लोकशाहीकरण आणि सामुहिकीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. शंकर
गुहा नियोगी म्हणायचे तसे, प्रत्येक गावात शाळा आणि दवाखाना
असायलाच हवा. नियंत्रणापेक्षा व्यवस्थापन महत्त्वाचे असते. केंद्रीकरणाचा भर
नियंत्रणावर असतो. त्यामुळेच केद्रीकरणाचे गब्बर नोकरशाहीमध्ये- (साहेबीकरणात)
रुपांतर होते. नोकरशाहीमुळे लोकसेवकांपेक्षा नोकरशहा जन्माला येतात.
वैश्विक
भविष्य चिंतन: ५
उस्फुर्त होणाऱ्या घटनांची गती, आवाका आणि
त्याचे परिणाम पाहिले तर आपण वैश्विक समुदायाचे घटक आहोत हे दिसून येते. भविष्यात
हे अजून झपाट्याने बदलत जाणार आहे असेच दिसते.
१)
स्वित्झरलैंडने कोवीडग्रस्त देशांशी सॉलीडैरीटी दाखवत एक महत्त्वाचा संदेश जगाला
दिला. संकटकाळात अशा सिम्बॉलिक सॉलिडैरिटीचाही मानसिक परिणाम होतो. तसेच आंतरराष्ट्रीय
संबधांतही फरक पडतो.
२) क्युबाने मेडिकल
सॉलिडैरिटी दाखवत कोरोनानंतरच्या काळात एका वेगळ्या जगाच्या कल्पनेला मुर्त
देण्यास सुरुवात केली आहे. इटली,
अंगोला, व्हेनेझुएला अशा देशांना मदत करून
लोकशाहीप्रधान आणि आरोग्यसेवेला प्राधान्य देणाऱ्या जागतिक संस्थेचे गरज अधोरेखित
केली आहे.
३) ऑईलवर मक्तेदारी असलेल्या इस्लामीक देशांनी
भारतातील जमातवादी प्रपोगंडाला गंभीर घ्यायला सुरुवात केलेली दिसते आहे. जमातवादी
द्वेषाणूमुळे जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच, लाखो सर्वधर्मीय
भारतीय जे इस्लामी देशांमध्ये रोजीरोटी कमावतात त्यावर आणि देशाच्या परराष्ट्र संबधांवर
याचा परिणाम होवू शकतो.
४) कोरोना संकटाच्या काळात काहींचा चायनाज्वर
उफाळून आलेला दिसतो. चीनला खलनायक करुन कोरोना संकटातून बाहेर पडता तर येणार नाहीच
पण, सोबतच भविष्यात संकटे ओढवून घेतले जातील.
५) अफ्रिकन देशात, दक्षिण अमेरिकेत आणि मध्य
आशियाई देशांमध्ये कोरोनाचे संकट आहे हे भारतीय माध्यमांना माहिती आहे की, नाही. बहुतेकदा विश्व म्हणजे पश्चिम युरोप आणि यु. एस. ए. कोरोना नंतरच्या
जगाची कल्पना ही लोकशाहीवादी आणि खऱ्या अर्थाने वैश्विक असावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा