गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

इक्बाल : दक्षिण आशियातील महत्तम आधुनिक कवी आणि तत्वज्ञ!




           इंग्लंडमधील केम्ब्रिज,जर्मनीमधील हाइडलबर्ग और म्यूनिख़ येथे 'तत्वज्ञान' विषयाचे शिक्षण घेणारे इक्बाल ब्रिटीश भारतातील महत्वाचे कवी आणि राजकारणी होते. जिन्नाना मुस्लीम लीग मध्ये येण्यासाठी सातत्याने पत्र लिहिणारे इक्बाल आधुनिक काळातील भारतातीलच नव्हे तर जगातील महत्वाचे तत्वज्ञ होते.
एकोणिसाव्या शतकात झालेल्या मुस्लीम विशिष्ट आणि भारतीयांच्या सकल चर्चाविश्वाचा इक्बाल यांच्या चिंतनावर प्रभाव झालेला दिसतो. 1904 मध्ये 'तराना-ए-हिंद' ('हिंदी हैं हम वतन है हिंदोस्तां हमारा') लिहिणारे इक़बाल, 1910 मध्ये 'तराना-ए-मिल्ली' ('मुस्लिम हैं हम, वतन है सारा जहाँ हमारा') असे का लिहितात ? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.
          इक्बालांच्या लिखाणात परंपरा आणि आधुनिकता, भौतिक जग आणि धार्मिक जीवन तसेच पश्चिम आणि पूर्व अशा सगळ्याच गोष्टी दिसतात. लोकशाही, प्रतिनिधित्व, स्वयं निर्णयाचा अधिकार, स्वातंत्र्य, स्वायत्तता अशा सगळ्याच राजकीय गोष्टी त्यांच्या चिंतनात येतात.
        इक्बाल यांच्यासारखेच अरबिंदो हेही अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे जीवन सुद्धा अशा अनेक घडामोडींनी भरलेले आहे. दोन्ही लोकांचे बौद्धिक आणि वैचारिक चरित्रे मराठीत असायला हवीत.

 २१ एप्रिल २०२०  फेसबुक पोस्ट!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दख्खनचे दंगे आणि सहकार चळवळीची निर्मितीची पार्श्वभूमी

         “ इतर गावकऱ्यांसारखा मी पैमाष करणाऱ्या भटकामगारांची मूठ गार केली नाही यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर...