रविवार, ३ मे, २०२०

हमीद दलवाई स्मृती!


आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत ठळकपणे उठून दिसेल असे व्यक्तिमत्व म्हणजे हमीद दलवाई!
स्वातंत्र्योत्तर/ वसाहतोत्तर भारतात फाळणीचे भूत आणि धर्मनिरपेक्षतेचे भविष्य याच्याशी कसे भिडायचे असा महत्वाचा प्रश्न होता. त्याला भिडण्याचे काम हमीद दलवाईनी केले. त्यांना जसे कळले, त्यांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून त्यांनी मुस्लीम प्रश्नांविषयी आणि भारताच्या धर्मनिरपेक्षतेविषयी मांडणी केली. 

'हमीद' ह्या अनिल अवचट लिखित पुस्तकात दलवाई यांच्याविषयी चांगली समीक्षा आहे. अवचट त्यांचे जवळचे मित्र असल्यामुळे हमीदच्या मांडणीतील महत्वाचे दुवे आणि कमकुवत दुवे काय होते? हे अवचटानी चांगले मांडले आहे.

फाळणीच्या पार्श्वभूमीवरील मुस्लीम प्रश्नांची मांडणी आणि चिकित्सा, आजच्या संदर्भात कशी समजून घेणार? हा प्रश्न आजही महत्वाचा ठरतो. हमीद आणि त्यांच्या मुस्लीम सत्यशोधक मंडळविषयी अनेकांची वेगवेगळी मतमतांतरे आहेत.

मुस्लीम समाजाची चिकित्सा करणारे हमीद दलवाई हिंदुत्ववादी मंडळीना आपलेसे वाटतात पण, त्याच हमीद दलवाईनी हिंदुत्ववादाची केलेली चिकित्सा मात्र ते सोयीस्कर विसरतात.

काही मार्क्सवादी मंडळीनीसुद्धा हमीद भाईनां 'लेबले' लावली होती. तो काळही कटकारस्थानांचा होता. महाराष्ट्रातील अनेक विद्वान मंडळी अमेरिकेच्या फंडावर वैचारिक आणि बौद्धिक कार्यक्रम चालवत होती. तसेच, काही रशियन पगार घेत होती. त्यामुळे एकमेकांना लेबले लावणे हे त्या काळाचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.

प्रभाकर वैद्यांनी हमीदने मुस्लीम समाजाची चिकित्सा केली पाहिजेच पण त्यातून दुसऱ्याच्या राजकारणाला फायदा होवू नये असेही म्हटले होते. पुढे, काही मंडळ आणि संघ यांच्यात संवाद आणि वादविवादही झाले. हमीद चे काही सहकारी त्यांना सोडून गेले. काहींनी मंडळाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले.

आजही, हमीद दलवाई यांच्या कार्याचे अत्यंत महत्व आहे. सोबतच हमीद यांच्या मांडणीच्या अनेक मर्यादा स्पष्टपणे जाणवत आहेत. आजच्या काळात मुस्लीम प्रश्न, इस्लाम आणि भारताचे भविष्य यांचा विचार करतांना हमीदची दखल घ्यावीच लागेल. तसेच, त्यांच्या मर्यादांची चिकित्सा केल्याशिवाय पुढची दिशा आणि मार्ग सापडणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दख्खनचे दंगे आणि सहकार चळवळीची निर्मितीची पार्श्वभूमी

         “ इतर गावकऱ्यांसारखा मी पैमाष करणाऱ्या भटकामगारांची मूठ गार केली नाही यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर...