शनिवार, २३ मे, २०२०

इतिहासकार आणि प्रपोगंडा




अमेरिकेतील बर्नार्ड लेविस हे "इतिहासकार" वारले. त्यानिमित्ताने एक्स्प्रेस आणि हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रात बातमी आली. त्यावरून ही आंतरराष्ट्रीय बातमी झालेली दिसते.

बेंजामिन नेत्यानाहू (इस्रायल प्रधानमंत्री) हे म्हणतात की, " बर्नार्ड लेविस हे आमच्या काळातील सर्वोत्कृष्ट इतिहासकारांपैकी इस्लाम आणि मध्य-पूर्वचे महत्वाचे इतिहासकार होते. (संदर्भ- २३ मे २०१८, इंडियन एक्स्प्रेस)
                                               
बर्नार्ड लेविस हे पक्के इस्रायल समर्थक ज्यू होते. २००३ मध्ये इराकवर जे अमेरिकन आक्रमण झाले त्याच्या नियोजनात लेविस यांचा मोठा वाटा होता. त्यांनी पुढील पुस्तके सुद्धा लिहिली आहे. द अरब्स इन हिस्ट्री, द इमरजेंस ऑफ मॉडर्न तुर्की, द क्रायसिस ऑफ इस्लाम.   (संदर्भ- द हिंदू, २१ मे २०१८)

काही महत्वाचे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले.
 १) पक्का इस्रायल समर्थक ज्यू व्यक्ती 'वस्तुनिष्ठ/ व्यासायिक इस्लाम धर्माचा आणि मुस्लीम समाजाचा इतिहास लिहू शकतो का? आणि समजा, त्याने लिहिला तर तो त्या विषयाला न्याय देईल का?
 २) इतिहासकारावर देश, धर्म, आणि इतर अस्मितांचा प्रभाव असावा का ? त्या अस्मितांचा त्याच्या लिखाणावर प्रभाव पडणे योग्य आहे का? त्यातून विषयाशी प्रतारणा होत नाही का?
३) इतिहासकारच जर पक्षपाती होवू लागले तर इतिहास कोणी समजून सांगावा आणि लिहावा?
४) इतिहासकाराने युद्धाचे समर्थन करावे की, जीवित-मृत लोकांच्या अधिकारांचे समर्थन करावे.
५) इतिहासकाराने सरकारी किंवा इतरांचे प्रचारक व्हावे का?  असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

 भारताच्या संदर्भात आपण पुढील चर्चा केली पाहिजे. ज्या लोकांचा आपण  द्वेष करतो, तिरस्कार करतो, त्यांना विरोधक/शत्रू मानतो, त्यांच्यामुळे सगळे वाईट झाले असे समजतो त्यांच्या इतिहासाला अभ्यासात न्याय देतो का ?  हल्ली, विरोधी पक्षाचा/ विचारांचा, लोकांचा अभ्यास त्यांना खलनायक ठरविण्यासाठीच केला जातो. विरोधी गटाचा व्यक्ती आपल्या लेखनात नायक बनतच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...