कालपरवाच धार्मिक अभ्यासक असलेला
व्यक्ती, धर्माला मानसिक विकार म्हणतो तर मानसिक आरोग्य क्षेत्रातील
अभ्यासक धर्म हा माणसाला मानसिक आजारातून बरा करतो असे म्हटतात असे वाचले
आहे. त्यामुळे धर्माची चर्चा करतांना निव्वळ बुद्धिवाद, नास्तिकता
यांना केंद्रस्थानी ठेवून चर्चा करण्यापेक्षा लोकांचे सामजिक, नैतिक, भौतिक
आणि मानसिक जीवन आणि धर्म यांचा काय सबंध आहे. हे पडताळून पाहिले पाहिजे.
धर्म जीवनात पारंपरिक लोकाचार, रुढी, परंपरा ह्या सुद्धा येतात. नुसते
धर्मग्रंथ येत नाहीत. धर्मजीवनाने मानवी सर्वांग बांधलेले असते. धार्मिक
इतिहास (religious history), धर्माचा इतिहास (history of religion) आणि
धर्माचा मानवशास्त्रीय व्यवहार (anthropology of religion) अशा वेगवेगळ्या
पातळीवर धर्माचे वेगवेगळी रूपे दिसतात.
महाराष्ट्रात दि. के. बेडेकर, गं. बा. सरदार, नलिनी पंडित आणि रावसाहेब कसबे (इतरही आहेत) यांनी धर्म चिंतन, धर्म सुधारणा, आधुनिकता आणि धर्म, इहवादी शासन आणि धर्मस्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता आणि धर्मांतर ह्या विषयांवर महत्वाची चर्चा केलेली आहे.
धर्मचिकित्सा, धर्मचिंतन, धर्मनिरपेक्षता, धर्मांतर आणि धर्मविरोध यासंबधी चर्चा, वादविवाद करण्याआधी किमान वरील लोकांचे लिखाण वाचले पाहिजे म्हणजे चर्चेला, वादविवादाला एक बैठक मिळते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा