खाद्यसंस्कृती: विशेषसंदर्भ बीफ
-
देवकुमार अहिरे
संस्कृती ही व्यापक मुल्यवाचक संकल्पना आहे. त्यामुळे संस्कृतीचा विचार करतांना नेहमी
स्थानाचा,संदर्भाचा
आणि काळाचा विचार करावा लागतो अन्यथा संस्कृतीच्या अभ्यासात अनेक अडथळे निर्माण
होवू शकतात कारण संस्कृती ही नेहमी प्रवाही असणारी गोष्ट आहे. म्हणून सर्वसामान्यपणे संस्कृतीची
व्याख्या करतांना “मानवी
जगण्याचा व्यवहार म्हणजे संस्कृती” अशी केली जाते.आर्नोल्ड टोयम्बी यांच्यासारखे इतिहासकार संस्कृतीला
मानवीजीवनातील महत्वाचा भाग मानतात.त्यांच्यामतानुसार संस्कृतीचा उदयास्त म्हणजे इतिहास होय.संस्कृतीचा संघर्ष म्हणजे काय? हा प्रश्न आपणास पढू शकतो. एकाचवेळी अनेक संस्कृतीचा उदय, विकास आणि ऱ्हास होत असतो. प्रदेश, समूह,देश,भौगोलिक परिस्थिती,पर्यावरणीय परिस्थिती यांचा संस्कृतीच्या
जडणघडणीवर परिणाम होत असतो. त्यामुळे एकाचवेळी वेगवेगळ्याठिकाणी संस्कृतीचा उदय होतो
किंवा एकाचठिकाणी वेगवेगळ्यावेळी संस्कृतीचा उदय होत असतो त्यामुळे सांस्कृतिक
संघर्ष होण्याची शक्यता असते.परंतू वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये नेहमी फक्त सांस्कृतिक
संघर्षच होत नाही तर बहुतेकवेळा सांस्कृतिक संवाद आणि सांस्कृतिक समन्वयसुद्धा
होतो.
खाद्यसंस्कृती
ही एक व्यापक संस्कृतीचा किंवा सार्वजनिक संस्कृतीचाच भाग आहे. खाद्यसंस्कृतीचा इतिहास खूपच मजेशीर आहे. प्रदेशागणिक खाद्यसंस्कृतीला वेगवेगळे
वैशिष्ट आहेत. भारतीय
समाजव्यवस्था हि जातवास्तवावर उभारलेली असल्याने खाद्यसंस्कृतीवरही जातवास्तवाचा
प्रभाव दिसून येतो. त्याप्रमाणे
प्रदेशागणिक जातवास्तव आणि खाद्यसंस्कृतीत बदल होतांनाही दिसतो. भारतात खाद्यसंस्कृतीला जमातवादी आणि
जातीवादी राजकारणाचीसुद्धा किनार आहे त्यामुळे व्यापक राजकारण समजून घेतल्याशिवाय
खाद्यसंस्कृती आपणास समजून घेता येत नाही.शाकाहार आणि मांसाहार या
खाद्यसंस्कृतीतील भेदांना तात्विक आणि राजकीय संदर्भांची बैठक आहे. त्यामुळे बर्याचदा शुद्ध शाकाहारी
माणसांनी शाकाहाराच्या आग्रहापोठी माणसांचे खुनसुद्धा केले आहेत.खाद्यसंस्कृतीला धार्मिक रंग देण्याचाही
इतिहास आहे.त्यामुळे
विशिष्ट प्रकारच्या गोष्टी विशिष्ट प्रकारचेच लोक खातात हा राजकीय भ्रमसुद्धा अनेकांनी
अजूनही जोपासला आहे.
खाद्यसंस्कृतीतील
मांसाहारावर मी भाष्य करणार आहे. मांसाहारामध्येही अनेक प्रकारचे ‘मांस’ खाल्ले जाते.चिकन,बीफ,पोर्क आणि मटन अशाप्रकारचे इंग्रजी शब्द
आहेत. परंतू
भारतात अनेक प्रकारचे मांस खाल्ले जाते. आदिवासी, दलित, भटक्या जमातींचा विचार केला तर आपणास त्याची कल्पना येईल. उदा. उंदीर, डुक्कर,खार म्हैस,बैल आणि अजून बरेच काही. बीफ या प्रकारची चर्चा आपण करणार आहोत. तत्पूर्वी बीफमध्ये कशाचा समावेश होतो हे
समजून घेवूयात. आपल्याकडे
बीफ संदर्भात अनेक भ्रम आहेत मुलत: हे सर्व राजकीय भ्रम आहेत. रेडा,म्हैस,गाय,बैल यांच्या मांसाचा बीफ या प्रकारात
समावेश होतो. बीफ खाणे हे
लोकसंस्कृतीचा भाग आहे. तसेच
लोकानुरंजनकारी संस्कृती आणि पर्यायी संस्कृतीचाही भाग आहे.बीफ कोण कुठे खातात यावरून ती शोषित-वंचितांची आणि अभिजनांची संस्कृतीही ठरते.
बीफचे जातीवादी आणि जमातवादी राजकारण
समजून घेणे गरजेचे आहे. विशेषता
समकालीन भारतात बिफवरून सातत्याने राजकारण पेटत आहे. भारतात प्राचीन कालपासूनच गोमांस खाण्यात
आले आहे. यज्ञांमध्ये
मोठ्याप्रमाणात पशूंची आहुती दिली जात होती. त्यामध्ये अनेक प्राण्याचा समावेश होत होता. विशेषत गाय आणि बैल यांचा. जैन-बुद्ध काळात प्राण्याच्या आहुतीला
मोठ्याप्रमाणात विरोध करण्यात आला त्यातून यज्ञसंस्कृतीविरोधी कृषकसंस्कृती हा
संघर्ष झाला. प्राणीहत्या
वर्ज्य झाली. अहिंसा हे
तत्व धार्मिकतेचे अधिष्टान बनले नंतरच्या काळात जैन-बौद्धांची अहिंसा ब्राम्हणधर्माने
स्वीकारली. इसवी
सनाच्या ६-७ शतकानंतर
भारतात तंत्रधर्माचा प्रभाव वाढला. तंत्राच्या पाच मकारांपैकी मांस खाणे हा एक विधी आहे. त्यामुळे पुन्हा मांस खाण्याला तात्विक
अधिष्टान तंत्रधर्माने मिळवून दिले. ७-८ व्या
शतकात तुर्क-मोघल राज्यकर्त्यावर्गाबरोबर
इस्लाम धर्म भारतात शासकांचा धर्म म्हणून आला. परंतू प्रजेचा धर्म आणि लोकाचार
प्रदेशागणिक वेगळा असल्याने सर्व लोकांनाच राज्यकर्त्यालोकांनी हिंदू हि भू-राजकीय संकल्पना धार्मिक अर्थाने वापरली. परंतू हिंदू नावाच्या या लोकसमुहांचे अनेक
जाती-गटात विभागणी होत होती. प्रत्येक जातीचा खाद्यव्यवहार हा
काहीप्रमाणात सारखा आणि बर्याचप्रमणात वेगळा होता. तुर्क-मोघल काळात गोवध वरून अनेकवेळा प्रश्न
निर्माण झाले आहेत. गायी ही
शेतीसाठी उपयोगी प्राणी असल्याने कृषीकेंद्री अर्थव्यवस्थेत न कळत गायीचे महत्व
वाटते. तसेच अभिजन हिंदूजातीय
लोकांसाठी गाय धार्मिकदृष्ट्या पवित्र ही समजली जात होती. परंतू अश्पृश जातीमध्ये गायीला
धार्मिकदृष्ट्या तसे काहीसे महत्व नव्हते. मुस्लिमांमध्ये बीफ खाण्यात येते.सरावाच मुसलमान बीफ खातात हासुद्धा भ्रम
आहे.विशेषत मुजावर जातीचे
मुसलमान बीफ खात नाहीत. अनेक
मुसलमान राजकर्त्यांनी हिंदू प्रजेच्या भावनेचा आदर करून गोवधबंधी केलेली दिसते. तर काही वेळा गोवध सर्रास केलेला दिसतो. यामध्ये राजकीय करणे आणि काहीवेळा धार्मिक
करणेसुद्धा होती. शासनकर्ता
वर्ग सामाजिक-राजकीय-धार्मिक आणि मानसिक अशा सगळ्याच प्रकारे
प्रजेवर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. उदार आणि कर्मठ विचारांच्या राज्यकर्त्यांच्या धोरणातही बदल
झालेला दिसतो.
वसाहतीक
काळात जमातवादी राजकारणाला चालना खऱ्या अर्थाने मिळाली. वसाहतीकपूर्व काळात विभिन्न धर्मीय-पंथीय जनसमूहांमध्ये तान-तणाव झालेले दिसतात पान त्याला जमातवादी
स्वरूप व्यापक पातळीवर मिळालेले दिसत नाही.वसाहतीक सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे मोठ्याप्रमाणात
दुष्काळाला सामोरे जावे लागले. मोठ्याप्रमाणात मनुष्यहानी आणि प्राणीहानी झालेली दिसते. वसाहतीक काळातच ख्रिस्ती धर्माचिंतनाला
आणि वाढत जाणाऱ्या धर्मप्रभावाला विरोध म्हणून हिंदूमध्ये शुद्धी आणि संघटन आणि
मुसलमांमध्ये तबलिक आणि तंजीम या चळवळी सुरु झाल्यात. सोबतच वसाहतीक राजकीय अर्थकारणामुळे
मोठ्याप्रमाणात आर्थिक बदल घडून येत होते. त्यातून असुरक्षितता निर्माण झाल्याने लोकांमध्ये वरील
धार्मिक चळवळीना मोठ्याप्रमाणात पाठबळ मिळू लागले. त्यातूनच पश्चिम भारतात पहिल्यांदा पारशी
मिल मालकाने आणि नंतर आर्य समाजाशी संबंधित असणाऱ्या गुजराथी मिल मालकाने गोरक्षणी
सभा काढली. त्यातून गोवध
विरोधाला राजकीय चळवळीचे स्वरूप मिळाले त्यातून जमातवादी राजकारण उभे राहिले. हे जमातवादी राजकारण हिंदू-मुस्लीम अभिजन जातवर्गीय समूहाचे होते. कारण याच काळात सत्यशोधक समाजाच्या
कार्यकर्त्यांनी गोरक्षण चळवळीचे उद्देश गाय वाचवणे नसून पैसे कमविणे हा आहे.असा प्रचार केलेला दिसतो.
१८९३ च्या
दंगलीत गुजराथी मिल मालकाने हिंदू कामगारांची सभा गोरक्षणी चळवळीच्या माध्यमातून
घेतलेली दिसते. यातून
जमातवादी चळवळीचे राजकीय अर्थशास्त्र स्पष्ट होते. मिल मालकाने स्थापन केलेल्या गो रक्षणी
चळवळीत सहभागी होवून हिंदू कामगार आपल्याच सोबत काम करणाऱ्या मुस्लीम कामगारावर
चालून गेले. नारायण
मेघाजी लोखंडे यांनी हि फुट पडू नये म्हणून अनेक प्रयत्न केलेले दिसतात. नंतरच्या काळातही अशा प्रकारचे राजकारण
झालेले दिसते. मागच्या
आठवड्यातच गुजरात राज्यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दलित युवकांना मारहाण
करण्याच्या बातम्या येवून गेल्यात. या सगळ्या राजकारणाचा आणि अर्थकारणाचा विचार केल्याशिवाय
आपणास बिफच्या लोकसंस्कृती,लोकानुरंजनवादी संस्कृती,पर्यायी संस्कृती आणि कनिष्ट-अभिजन संस्कृती याचा विचार करता येणार
नाही म्हणून ह्या मुद्याची सविस्तर चर्चा केली.
लोकसंस्कृती:
बीफमध्ये
बैल,गाय,म्हैस आणि रेडा यांचे मांस खाण्यात येते. दलित जातींमध्ये महार,मांग,भंगी या सारख्या समूहातील लोक हे खातात. ख्रिस्ती आणि मुस्लीम या अल्पसंख्यायक
समाजातील अनेक जातसमूहसुद्धा हे खातात.दलितांमध्ये गावातील स्वछेतेचे काम असल्याने गावातील मेलेली
जनावरे हि लोक खपून खात असत आणि बर्याचदा खाण्यासाठी काही नसले की, गावातील लोकांच्या जनावरांना ही लोक
काहीतरी करून मारून टाकत आणि मग पुन्हा यांनाच त्याची विल्हेवाट लावावी लागे. नंतरच्या काळात शिक्षणामुळे झालेल्या
बदलांमुळे दलित समाजातील लोक मेलेली जनावरे खाण्यापेक्षा मार्केटमध्ये जावून विकत
घेवून खातात. मुस्लीम आणि
ख्रिस्ती समाजांमध्ये सणांच्यावेळी किंवा लग्नाच्यावेळी बिफचे जेवण असते. परंतू सध्या संस्कृतीकरण, राजकीय बदल यामुळे या समूहातील लोकांच्या
या खाण्याच्या लोकसंस्कृतीवर नकळत दडपण येत आहे. सरकार काय खायचे, काय खायचे नाही? हे ठरवत असल्याने लोकांचा अन्न सेवनाचा
मुलभूत अधिकार नाकारला जात आहे.
लौकिक
संस्कृती:
बीफ हे परंपरेनुसार खाणाऱ्या लोकांपेक्षा नवीन प्रकारच्या
लोकांचेही खाणे होत आहे. दलित, ख्रिस्ती आणि मुस्लीम या लोकांच्या
पलीकडेही बीफ खाणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. म्हणून तर जगात सगळ्यात जास्त बीफ बाहेर
पाठवणारा देश भारत ठरला आहे. अनेक लोक आवड म्हणून बीफ खातात. अनेकांना शरीरासाठी बीफ चांगले असते
म्हणून खातात. इतर
मांसाहारापेक्षा सकस आणि स्वस्त असल्यामुळेही अनेकजण बीफ खाण्याला प्राधान्य देतात. प्रत्यक्ष बीफ जरी खात नसले तरी बीफपासून
बनलेल्या अनेक वस्तूंचा वापर करणारा खूप मोठा वर्ग भारतात आणि भारताबाहेर आहे. अनेकांना हे माहितही नसते कि, आपण जे वापरतो आहे. त्याच्या कंटेंटमध्ये बीफचा विशिष्ट
प्रकारचा भाग आहे.भारतातील
मोठे बीफ विक्रेते हे दलित,मुस्लीम आणि ख्रिस्ती नाहीत.
पर्यायी
संस्कृती:
बीफ खाण्याला पर्यायी संस्कृतीचे
प्रतिक म्हणूनही पहिले जाते. बर्याचवेळा पुरोगामी,विज्ञानवादी,आधुनिक,नास्तिक असण्याचे लक्षण म्हणूनही बीफ खाल्ले जाते.हे मुळात: सिम्बोलिक आहे. बीफ पार्टी ही संस्कृतीच शाकाहारी
मूलतत्ववादाला प्रतीरोध म्हणून जन्माला आली आहे. बीफ खाण्याला वाईट आणि निषिद्ध मानणाऱ्या
विचारसरणीच्या विरोधी बंड म्हणून बीफ पार्टीचा कार्यक्रम आयोजित केला जात असतो. या कार्यक्रमाचे यश हे कि, ज्यांना गोमाता मारल्यामुळे वाईट वाटते ते
लोक गोमातेच्या प्रेमापोटी माणसांही मारून टाकायला कमी करत नाहीत.बीफ खाल्याने लोक हिंस्र होतात असे
म्हणणारे शाकाहारी लोक बिफ खाणाऱ्यांच्या विरोधात मोठी हिंस्रता पसरवतात. शाकाहारींच्या अशा दांभिकवृत्तीमुळे
बीफपार्टी संस्कृतीला महत्व येत आहे. कारण हा नुसता खाण्याचा प्रश्न नसतो तर विचारांचा संघर्ष
असतो.
बीफ पार्टीचे आयोजन करण्यात दलित
विद्यार्थ्यांचा पुढाकार मोठ्याप्रमाणात देशभरात दिसून आला आहे. कारण
दलित लोकांच्या लोकसंस्कृतीचा आणि आहाराचा अविभाज्य भाग आहे बीफ. परंतू देशातील अभिजनजात वर्गातील लोक आपला
शाकाहारी मूलतत्ववाद या लोकांवर लादत आहेत. आणि दलितांच्या आहाराला वाईट आणि निषिद्ध ठरवत आहे. भारतातील अभिजनजातवर्गांमध्ये बीफ
खाण्याविषयी अनेक भ्रम आहेत.सगळे भ्रम अवैज्ञानिक आहेत. पर्यायी सांस्कृतिक राजकारणाच्या
माध्यमातून आपली लोकसंस्कृती जपण्याचे प्रयत्न बीफ पार्टीच्या निमित्ताने केले जात
आहे. परंतू
लोकसंस्कृती म्हणून जसे व्यवहार केले जात होते त्याप्रकारचे व्यवहार पर्यायी
संस्कृतीत केले जात नाही. कारण
लोकसंस्कृती बीफ खाणे हि नैसर्गिक मानले असल्याने ती राजकीय लढाई होत नाही परंतू
पर्यायी संस्कृतीत आम्ही जे खातो त्यालाच निषिद्ध तरवून वर्ज्य केले जाते. त्याच्या विरोधात प्रतिकार हा पर्यायी
संस्कृतीत केला जातो. पर्यायी
संस्कृतीत बर्याच गोष्टी जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक केल्याजातात त्यामुळे
पर्यायी संस्कृती ही मुलत: राजकीय लढाई असते
खाद्यसंस्कृतीत
बीफ चे वेगळेपण :
भारतातील
सगळ्यात जास्त वादग्रस्त खाद्य म्हणजे बीफ होय. अनेक प्रकारचे भ्रम असल्यामुळेसुद्धा बीफ
जास्त वादग्रस्त होत असते. सगळ्यात महत्वाचा भ्रम म्हणजे बीफ म्हणजे गायीचे मांस. परंतू हे वास्तव नाहीये हे आपण वर पहिलेच
आहे. त्यानंतर
बीफ खाल्याने मानूस हिंस्र बनतो म्हणून तो अन्याय-अत्याचार करतो. कारण बीफ खाणे हे वाईट आहे. दुर्गुणांचे लक्षण आहे. नंतर बीफ खाल्याने बुद्धी चालत नाही. त्यामुळे सगळ्याच महत्वाच्या जागांवर
अभिजनजातीय हिंदूच का असतात कारण त्यांचा आहार हा शुद्ध आणि सात्विक असतो. अशाप्रकारचे अवैज्ञानिक भ्रमासुद्धा
पसरविले जातात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा