भगतसिंह, चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे काही क्रांतिकारी साथी शहिद झाल्यावर बाकीच्या साथी लोकांनी काय केले असेल ? असा प्रश्न बहुतेकांना पडत नाही.
नौजवान भारत सभा, युगांतर आणि अनुशीलन समिती ह्या संघटनांमधील बरीच क्रांतिकारी जेलमध्ये गेली. काही लोक देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत जेलमध्येच होती. काही जेलमधून बाहेर पडली होती.
क्रांतिकारी चळवळ ब्रिटिशांनी दडपून टाकल्यामुळे अनेकांनी काँग्रेसमध्ये सहभाग घेतला कारण, याच काळात काँग्रेसमध्ये जवाहरलाल आणि सुभाष बोस यांचा उदय होत होता. पूर्वाश्रमीच्या बहुतेक क्रांतिकारी मंडळी काँग्रेस अंतर्गत स्थापन झालेल्या ' काँगेस समाजवादी गटा'चे सभासद झाली. काँग्रेस समाजवादी गटात तीन प्रकारची मंडळी होती. १. मार्क्सवादी - जय प्रकाश या गटाचे नेते, २. समाजवादी - राममनोहर लोहिया ३. दोन्ही गटां मध्ये समन्वय स्थापन करणारा तिसरा गट- त्यात आचार्य नरेंद्र देव.
पुढे, १९३७ नंतर काँग्रेस समाजवादी मधील मार्क्सवादी मंडळी बाहेर पडली आणि त्यांनी काँग्रेस अंतर्गत स्वतःचाच ' काँगेस मार्क्सवादी' या गटाची स्थापना झाली. या गटात नौजवान सभा, युगांतर, अनुशीलन समिती मधील बहुतेक लोक होते. काहींनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता.'काँग्रेस मार्क्सवादी' गट प्रामुख्याने कानपूर, अलाहाबाद या भागामध्ये प्रभावी होता. बंगाल आणि पंजाब प्रांतातही त्यांचे काही लोक होते.
१९४० नंतर फाळणीची चर्चा सुरू झाली. कम्युनिस्ट पक्षाने प्रत्येक राष्ट्रीयतेला स्वयंम निर्णयाचा अधिकार आहे अशी भूमिका घेतली. कारण, पहिल्या महायुद्धानंतर जगभरात अशी भूमिका घेतली जात होती. राष्ट्र संघाची सुद्धा तशीच भूमिका होती. कम्युनिस्ट पक्षाच्या या भूमिकेला ' काँगेस मार्क्सवादी ' गटाने विरोध केला तसेच, फाळणीच्या विरोधात त्यांनी प्रचारही केला. १९४७ मध्ये या गटाचे नेते केशव प्रसाद मौर्य यांनी फळणीवर स्वतंत्र पुस्तकच लिहिले आहे.
१९४७ मध्ये देश विभाजित आणि स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस पक्ष सत्ताधारी पक्ष झाला. त्यामुळे वैचारिक मतभेद वाढू लागले म्हणून ' काँगेस मार्क्सवादी ' गटाने १९४९ मध्ये ' क्रांतिकारी समाजवादी पार्टी ' स्थापन केली.
अशा प्रकारे चंद्रशेखर आझाद यांचा वारसा आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचे स्थानिक, प्रादेशिक आणि सूक्ष्म इतिहासाच्या दृष्टीने काम वाढले पाहिजे. अजूनही, बरेच काही काम करण्यासारखे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा