आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात क्रांतिसिंह कॉ. नाना पाटील यांचे अनन्य साधारण महत्व आहे. क्रांतिसिंह म्हणजे वारकरी, सत्यशोधक, गांधीवादी आणि मार्क्सवादी विचारांचा जनकेंद्री मिलाप!
स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत कॉ. नाना पाटील यांची महत्त्वाची भूमिका आहे. १९३० नंतर महाराष्ट्रात बहुजन समाजातील तरुण मंडळी सत्यशोधक भूमिका घेत काँग्रेसमध्ये गेली. त्यावेळी एकीकडे गांधींचा उदय झाला होता आणि दुसरीकडे रशियन राज्यक्रांती नंतर साम्राज्यवाद विरोध म्हणत जगभरात मार्क्सवादी विचारांचा प्रभाव वाढत होता. याकाळात महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे समाजवादीकरण करणारी ब्राह्मणेतर तरुण मंडळी राजकारणात उतरली होती.
१९४२ चे प्रती सरकार हा तर भारतातील इतिहासातील सगळ्यात प्रभावी घटनांपैकी एक आहेत. सातारा सह बलिया आणि मदिनापुर येथे प्रती सरकार स्थापन झाले होते पण, सगळ्यात जास्त काळ टिकून राहिलेले आणि राजकीय, सामजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सांस्कृतिक अशा सगळ्या पातळींवर पर्याय निर्माण करणारे प्रती सरकार होते. त्यामध्ये क्रांतिकारक थरार तर होताच पण विधायक दृष्टीही होती.
पुढे, देशाचे स्वातंत्र्य जवळ आले असतांना काँगेस पक्षात भांडवलदार गटाचा प्रभाव वाढत होता. त्यावेळी काँग्रेस अंतर्गत शेतकरी आणि कामगार संघ काढून संपूर्ण मुंबई प्रांत, वऱ्हाड, विदर्भ आणि बेळगाव परिसर कॉ. नाना पाटलांनी फिरून काढला. लाखो शेतकऱ्यांच्या सभा घेतल्या. त्यामुळे तत्कालीन काँग्रेस मधील भांडवलदार समर्थक गटाने नाना पाटलांवर बंदी घातली होती. पुढे, नाना पाटील आणि त्यांचे सहकारी काँग्रेस मधून बाहेर पडले व १९४८ मध्ये त्यांनी शेकाप स्थापन केला. नानांचा पुढील प्रवास किसान कामगार पक्ष आणि मग, कम्युनिस्ट पक्ष असा झाला. कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेचे अखिल भारतीय नेते होते कॉ. नाना पाटील.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात दिल्ली सरकार खडे बोल सूनविण्याचे काम कॉ. नाना पाटील यांनी केले. दिल्लीच्या संसदेत मराठी या देशी भाषेत भाषण करणारा हा सर्वसामान्य कष्टकरी जनतेचा लोकसखा जनतेसोबत नेहमी रस्तावर च्या लढाई होता. दादासाहेब गायकवाड यांच्यासोबत जमीन सत्याग्रह करण्यासाठी जेलभरो करण्यात ही नाना पाटील आघाडीवर होते.
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळवलेले स्वातंत्र्य ठीकवण्यासाठी सदैव झटलेला महाराष्ट्राचा लोकनेता म्हणजे कॉ. नाना पाटील!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा