गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

अभिव्यक्तीची घुसमट!



         वसाहतिक काळात निर्माण झालेल्या सार्वजनिक क्षेत्राने, नवनवीन दळणवळणाच्या साधनांमुळे, मुद्रण क्रांतीने, साक्षरता विस्ताराने, चर्चा आणि वाद विवादिय वर्तुळांनी एक वेगळीच मानसिक आणि वर्तणुकीय क्रांती वसाहती देशांत आणि भांडवलशाही हीच वसाहतवादाची प्रेरणा असल्यामुळे संपूर्ण जगात एक वेगळीच अभिव्यक्त करण्याची पद्धती विकसित केली. त्यात एकमेकांशी कसे बोलायचे, कसे वागायचे, प्रणय आणि सेक्स कसा करायचा येथपासून ते अभिवादन, धन्यवाद कसे म्हणायचे तसेच कसे हसायचे, खायचे, कसे लाजयाचे येथपर्यंतच्या गोष्टींचा समावेश होतो. 

          अभिव्यक्तीच्या या चर्चेला व्यापक उदारमतवादी, मानवतावादी, उपयुक्ततावादी विचारांची बैठक होती. त्यामुळे आपण उदार असले पाहिजे, मानवतावादी असले पाहिजे याची चर्चा प्रामुख्याने नेहमी चर्चिली जात होती. विज्ञान, तंत्रज्ञान यांचा उपयुक्तता म्हणून सातत्याने विचार केला जात होता. 

          हल्लीचे सामाजिक पर्यावरण आणि वातावरणात लोकांना अभिव्यक्त होताच येत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जुन्या साच्यात अभिव्यक्त होणे आज कालबाह्य झाल्यासारखे वाटते. विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्यासोबत बदलेला समकाळ पहिला की, आजच्या काळात अभिव्यक्त होण्याची पद्धती, कौशल्ये, आणि साचे अजुन विकसित झालेले दिसत नाहीत. त्यामुळे घर, नातेसंबंध, प्रेमप्रकरण यांच्यापासून ते चर्चा, वादविवाद आणि वैचारिक मंथनात लोकांना अभिव्यक्त होताच येत नाही असे दिसत आहे. 

         अभिव्यक्त होता न येणे ही खूपच कठीण अवस्था असते. त्यामुळे माणूस सैराबैरा होतो. चिडतो, शिवीगाळ करतो. त्याला बाहेर काढायचे असते पण, काढण्याची कौशल्ये त्याला अवगत नसल्यामुळे त्याची घुसमट होते आणि मग त्यातून हिंसा, विध्वंस आणि नकार जन्माला येतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...