१) सनातनी ब्राह्मण घरात जन्मलेला मुलगा वैष्णव पंथ, आर्य समाज, बौद्ध धर्म अशा मार्गाने सातत्याने बदलत होता म्हणजे डीकास्ट होत होता. प्रत्येक जातीचा व्यक्ती डिकास्ट होवू शकतो हेच यातून स्पष्ट होते.
२) बौद्ध असतांनाही तुम्ही मार्क्सवादी असू शकतात म्हणजे मार्क्सवादी हे धर्माच्या विरोधात नसतात तर ते धर्माचाही खोल पातळीवर अभ्यास करतात. राहुल बौद्ध असूनही त्याने इतर धर्मांविषयी पक्षपाती लिखाण केले नाही. मार्क्सवादी झाल्यामुळे तो धर्माचा द्वेष्टा झाला नाही तर तो धर्माचा सम्यक चिकित्सक बनला. त्याने जैन, इस्लाम, हिंदू, ख्रिस्ती धर्माविषयी सुद्धा लिखाण केले आहे.
३) अभ्यास आणि चळवळ यांचे जवळचे नाते असते किंबहुना चळवळीमुळेच तुम्ही जास्त चिकाटीने अभ्यास करतात. बिहारच्या कमुनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य, किसान सभेचे नेते, कॉंग्रेसच्या स्वातंत्र्यचळवळीत काही वेळ राहुलने काढला होता. चळवळीमुळे अनेक वेळा जेलमध्ये गेले. जेलमध्ये वेळ मिळतो म्हणून तेथे काही पुस्तकांचे लिखाण.
४) राहुल स्वतःला घुमक्कडशास्त्री म्हणून घ्यायचा. जास्त फिरल्याने माणसाचे ज्ञान वृद्धिंगत होते. राहुल अनेक देश-प्रदेश फिरला आणि अनेक प्रवासवर्णने लिहिली त्यामुळे राहुलला हिंदी प्रवासवर्णनाचा जनक सुद्धा म्हणतात.
५) राहुल १४० च्या वर पुस्तके लिहिली. त्यामध्ये हिंदी साहित्य, धर्म, धार्मिक इतिहास, तत्वज्ञान, प्रवासवर्णने, बौद्ध साहित्य, मार्क्स, आणि मार्क्सवाद, सामाजिक-राजकीय प्रश्न, भाषा, इतिहास अशा अनेक गोष्टींवर त्याने लिहिले आहे. २१-२२ भाषा राहुलला येत होत्या. ( एका ठिकाणी प्रवीण बोरकरांनी त्यांना ८ भाषा येत होत्या असे लिहिले आहे. त्यांचा विशेष अभ्यास आहे पण माझ्या वाचनात २१-२२ भाषा आले आहे.)
टीप- राहुल चा पहिला तिबेट दौरा भदंत आनंद कौसल्यायन यांनी सुंदर शब्दात वर्णन केला आहे तो वाचवा आणि त्या दौऱ्याचे महत्व सावरकरांनी वर्णन केले आहे ते सुद्धा अधिक रस असलेल्या लोकांनी पाहावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा