सोमवार, ७ जून, २०२१

सांस्कृतिक राजकरणात कोणी मुसंडी मारली!

कधीकाळी पुरोगामी असणे प्रतिष्ठितपणांचे समजले जायचे आणि आजकाल ते सवंगपणाचे प्रतीक म्हणून सार्वजनिक चर्चेत पाहिले जाते. आजकाल आंबेडकरवादी, गांधीवादी, मार्क्सवादी, समाजवादी  सावरकरी हिंदूत्व, गोळवलकरी हिंदूत्व आणि बाकीच्या छोट्या, छोट्या जातीय आणि सामाजिक प्रवाहांमध्ये पुरोगामी ह्या शब्दाची निंदानालस्ती केली जाते. प्रत्येकाचा सोईचा पुरोगामीपणा इतरांचे त्याच्या विरोधी गेले की, पुरोगामी असण्याची टिंगलटवाळी केली जाते.  

काहींनी जाणीवपूर्वक पुरोगामी शब्दाला बदनाम केले आणि काही नकळतपणे या बदनामीच्या मोहिमेत सहभागी झाले. 


पुरोगामी असणे म्हणजे नक्की काय असणे? हे काही निश्चित नाही. पुरोगामी असण्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या, रूपे आणि छटा असू शकतात. म्हणूनच, विशिष्ट प्रकारचे असणे म्हणजे पुरोगामी असणे आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे सुद्धा पुरोगामी असण्याला बदनाम केले गेले.  सामजिक - आर्थिक स्थान, शैक्षणीक पार्श्वभूमी, वैचारिक बैठक व बौद्धिक क्षमता, राजकीय दृष्टी आणि विचारधारा, कौटुंबिक स्थिती आणि व्यक्तिगत स्वभाव, लैंगिकता आणि नैतिकता अशा अनेक गोष्टींच्या आधारावर पुरोगामी ठरवता येवू शकते पण त्यामुळे पुरोगामी असण्याच्या वेगवेगळ्या कल्पना येतील. 


जवळपास शंभरवर्षापूर्वी हिंदू महासभेेतील एक गट स्वतः ला पुरोगामी  आणि परिवर्तनवादी म्हणून घेत होता. कारण, त्यांचा त्यांच्या पक्षातील दुसऱ्या गटाच्या सामाजिक विचारांना विरोध होता. सनातनी शास्त्री पंडितांना विरोध करणारी मंडळी सुद्धा आपल्याला पुरोगामी शास्त्री पंडित म्हणून घेत होती. समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी चळवळीतील मंडळी खुशीने पुरोगामी म्हणून घेत होती. पण, काळ बदलला आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या! 


शब्दांच्या, भाषेच्या आणि सांस्कृतिक राजकरणात कोणाचा विजय झाला आहे हे डोळसपणे पहायची गरज आहे. ज्यांनी पुरोगामी असण्याला विरोध केला. त्यांचीच री पूर्वाश्रमीचे पुरोगामी ओढत आहेत आणि इतरांचे शब्द वापरत आहेत. 


उदा. 

१) उदारमतवादी मंडळींना विरोध करण्यासाठी काही हिंदुत्ववादी मंडळींनी ' लिब्रांडू ' हा शब्दप्रयोग केला. आजकाल काही ट्रोट्रस्कीवादी मंडळी त्याच शब्दाचा वापर करून काँग्रेसी उदारमतवादी लोकांना विरोध करत आहेत. 

२) सेक्युलर ह्या शब्दाची टिंगलटवाळी आधी कोण करत होते आणि आता कोण आधीच्या लोकांचें शब्द घेवून करत आहे हेही पाहिले पाहिजे. 

३) भिमटे,  फेमिनाझी, अर्बन नक्सल, टर्बन नक्षल,  जिहादी, जमात ए पुरोगामी अशी एक मोठी राजकीय शब्दावली ( Political vocubalory) कोणी निर्माण केली आहे. त्याचा सार्वजनिक चर्चेत, कुजबुजीत प्रसार कसा होत आहे. यावरून सांस्कृतिक राजकरणात कोण मुसंडी मारत आहे हे दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...