गुरुवार, १० जून, २०२१

बौध्द धर्म, मार्क्सवाद आणि बाबसाहेब आंबेडकर!


नेपाळमध्ये दिलेल्या 'बुध्द आणि/किंवा मार्क्स' या बाबासाहेबांच्या पुस्तकावर अनेकांनी चर्चा सुरू केली आहे. ऐतिहासिक संदर्भ लक्षात न घेता काही मंडळी आपल्याला हवी तशी सोईस्कर चर्चा करत आहेत. 


१. बाबासाहेबांनी ज्यावेळी 'बुध्द आणि/किंवा मार्क्स' हे भाषण ज्यावेळी दिले. त्यावेळी भदंत कौसल्यायान सुद्धा त्या कार्यक्रमात होते. पुढे भंतेंनी स्वतः ' बौध्द धर्म आणि मार्क्सवाद ' असे पुस्तके लिहिले. सदरील पुस्तक मूळ भंतेंचे भाषण आहे. १९५८ ते ६८ या दरम्यान ते श्रीलंकेत बौध्द विद्यापीठात होते. तेथे त्यांनी सदरील भाषण केले होते.  भदंत कौसल्यायन यांनी महाराष्ट्रात बौद्ध धर्माच्या विकासाला खूपच योगदान दिले आहे. 


२. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध सुरू झाल्यामुळे, पश्चिम आशिया,  आफ्रिकेप्रमाणेच पूर्व आशिया हाही शीतयुद्धाचे महत्वाचे क्षेत्र होता. त्यामुळे या भागात धर्म, संस्कृती आणि इतर अनेक गोष्टींचा त्यासाठी वापर झाला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व आशियाई देशांतील समजावादी आणि साम्यवादी पक्षांनी राष्ट्रवादी चळवळींच्या माध्यमातून बराच प्रभाव पडलेला होता. 

३. त्यामुळे 'बुध्द आणि/किंवा मार्क्स' ह्या बाबासाहेबांच्या भाषणाला भारतीय, पूर्व आशिया आणि जागतिक अशा संदर्भात पाहायला हवे. एकीकडे सोव्हिएत रशियाचा भौगोलिक आणि वैचारीक विस्तार आणि दुसरीकडे अमेरिकेचा डावपेचात्मक आणि आर्थिक प्रभाव ह्या प्रदेशामध्ये वाढत होते. त्यामुळे या प्रदेशात होणाऱ्या सभा, संमेलने, बैठका आणि भाषणे यांना शीतयुद्धाचा संदर्भ आहे. 


४. खाली दिलेली लिंक ही पूर्व आशियामध्ये  बौध्दधर्म, मार्क्सवाद, भांडवलशाही आणि राजकारण याची चर्चा करणाऱ्या लेखाची आहे. 


लिंक - https://newrepublic.com/article/147623/saffron-curtain-buddhism-weaponized-cold-war

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...