१. व्यक्ती म्हणून व्यक्तिगत विसंगती
ज्याने त्याने शोधणे महत्वाचे आहे. पण, व्यक्ती आणि
व्यक्तीचा व्यवहार मोठ्या सामजिक चौकटीत घडतो. त्याचे काय करायचे असा प्रश्न
निर्माण होतो. व्यक्ती हा नुसता 'Individual' नसून 'Bio-social'
पण
आहे. त्यामुळेच त्याचा व्यवहार हा फक्त त्याचा व्यवहार राहत
नाही तर एका विशिष्ट समाजात 'व्यक्तीने'
कसे
वागावे याचा व्यवहार बनतो. हे थोडे गुंतागुंतींचे प्रकरण आहे.
समाजाचे बारकाईने निरक्षण केले तर सारखाच व्यवहार वेगवेगळे व्यक्ती करतांना
दिसतात. मग प्रश्न असा उत्पन्न होतो कि, समाजातील
व्यक्तींचा असा व्यवहार आहे की, व्यक्ती या
समाजात असा व्यवहार करतात. त्यामुळे व्यक्तीला आणि त्याच्या व्यवहाराला सामाजिक
व्यवहार पूर्णत: वेगळे करता येत नाही असे मला वाटते. मानवशास्त्रात या गोष्टींची
चांगली चर्चा आहे. उदा. व्यक्तींचे वर्तन, स्त्रियांचे
चरित्रहनन,
कुजबुज,
कंडी
पिकवणे ह्या सगळ्या गोष्टी व्यक्तीच करतात पण, त्या
समाजातील वेगवेगळी लोक हेच करतांना
दिसतात. मग, ते खरच
व्यक्तिगत असते की, ते सामाजिक उत्पादन असते असा प्रश्न
निर्माण होतो.
२. व्यक्तीच्या जीवनांतील 'विसंगती'
आणि
'अंतरविरोध'
यामध्ये
आपण फरक करायला हवा. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्य अनेक
अंतरविरोधानी ग्रस्त असते हे मान्य पण, विसंगतींनी
भरलेले असते असे म्हणतांना मला वाटते यावर थोडा विचार झाला पाहिजे. विसंगती या
शब्दाने असे वाटते की, संबंधित व्यक्तीला आपण जे करतो ते
विसंगत आहे असे माहिती असते तरी तो करतो असे दिसते. हे अंतरविरोध ह्या शब्दाने
वाटत नाही. विसंगती ह्या शब्दामध्ये जाणीवपूर्वक करतो तर अंतरविरोध ह्या शब्दाने
नकळत होते असे दिसते.
३. आपल्या
व्यक्तिगत, खाजगी आणि सामुदायिक, सर्वाजानिक आयुष्यात एक तणाव नेहमी असतो. त्याचे
निर्मुलन करण्याची किंवा त्यात संतुलन
राखण्याची कसरत आपणास करावी लागते. त्यामुळेच अनेक प्रश्न उद्भवतात. म्हणूनच, मला
लोकांच्या व्यक्तिगत आणि खाजगी जीवनाच्या जडणघडणीच्या विकासात/ इतिहासात अधिक रस
आहे. त्यामुळे लोकांच्या दैनदिन जीवनाचा, सामाजिक भांडवलाचा आणि मानसिक वर्तनाचा
शोध घेता येतो. उदा. १. बायकांच्या व्यक्तिगत / खाजगी जीवनाचा अभ्यास केल्यास
आपणास त्यांचे दैनदिन जीवनव्यवहार कळतो. २. व्यक्तींच्या व्यक्तिगत आणि खाजगी
जीवनाचा अभ्यास केल्यास आपणास सामजिक- कौटुंबिक भांडवलाच्या जाळ्यामुळे व्यक्तींना
कोणते फायदे मिळतात. ३. खाजगी- व्यक्तिगत जीवनाचा अभ्यास केला तर आपणास अनेक
लोकांच्या मानसिक व्याधींचे मुळे कळतात.
शेवटी,
लोकांच्या खाजगी आणि व्यक्तिगत जीवनाचा अभ्यास करण्याचा तुमचा हेतू काय यावर खूप
काही अवलंबून आहे. लोकांवर चिखलफेक करणे, कुजबुज करणे, चरित्रहनन करणे हा हेतू आहे
की, व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत कशी का वागतात? त्याचा सामाजिक, मानसिक आणि भौतिक
काही संदर्भ आहे ? याचा शोध घेणे हा आहे. यावर सगळ्या गोष्टी ठरतात. मला एखादी गोष्ट पटते पण मला ती करता येत नाही,
काही गोष्टी अशा आहेत की, ज्यांनी माझे मनोविश्व व्यापून टाकले आहे, व्यक्ती आणि
व्यक्तीचा विचार आणि व्यवहार हा सुद्धा एका विशिष्ट काळाचे ‘अपत्य’ असते असे मला
वाटते. त्यामुळे ‘व्यक्ती’ असे का वागतात यात मला अधिक रस आहे. बाकी, महापुरुषांसह
(स्त्रिया) सगळ्यांचा व्यक्तिगत आणि सार्वजनिक व्यवहार नीट तपासाला पाहिजे असेच
मला वाटते. आपण नाही तपासला तर भविष्यात कोणीतरी तपासणार आहेच...! तपासण्याचा हेतू
काय ह्यावर बरेच काही अवलंबून असते. तसेही, खाजगी जीवनाविषयी सार्वजनिक ठिकाणी
कुजबुज (गॉसिप) करण्यात आपला समाज ( ज्यात पुरोगामी, प्रतिगामी, डावे- उजवे,
स्त्रिया- पुरुष) आघाडीवर आहेच की !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा