शनिवार, २३ मे, २०२०

इतिहासकार आणि प्रपोगंडा




अमेरिकेतील बर्नार्ड लेविस हे "इतिहासकार" वारले. त्यानिमित्ताने एक्स्प्रेस आणि हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रात बातमी आली. त्यावरून ही आंतरराष्ट्रीय बातमी झालेली दिसते.

बेंजामिन नेत्यानाहू (इस्रायल प्रधानमंत्री) हे म्हणतात की, " बर्नार्ड लेविस हे आमच्या काळातील सर्वोत्कृष्ट इतिहासकारांपैकी इस्लाम आणि मध्य-पूर्वचे महत्वाचे इतिहासकार होते. (संदर्भ- २३ मे २०१८, इंडियन एक्स्प्रेस)
                                               
बर्नार्ड लेविस हे पक्के इस्रायल समर्थक ज्यू होते. २००३ मध्ये इराकवर जे अमेरिकन आक्रमण झाले त्याच्या नियोजनात लेविस यांचा मोठा वाटा होता. त्यांनी पुढील पुस्तके सुद्धा लिहिली आहे. द अरब्स इन हिस्ट्री, द इमरजेंस ऑफ मॉडर्न तुर्की, द क्रायसिस ऑफ इस्लाम.   (संदर्भ- द हिंदू, २१ मे २०१८)

काही महत्वाचे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले.
 १) पक्का इस्रायल समर्थक ज्यू व्यक्ती 'वस्तुनिष्ठ/ व्यासायिक इस्लाम धर्माचा आणि मुस्लीम समाजाचा इतिहास लिहू शकतो का? आणि समजा, त्याने लिहिला तर तो त्या विषयाला न्याय देईल का?
 २) इतिहासकारावर देश, धर्म, आणि इतर अस्मितांचा प्रभाव असावा का ? त्या अस्मितांचा त्याच्या लिखाणावर प्रभाव पडणे योग्य आहे का? त्यातून विषयाशी प्रतारणा होत नाही का?
३) इतिहासकारच जर पक्षपाती होवू लागले तर इतिहास कोणी समजून सांगावा आणि लिहावा?
४) इतिहासकाराने युद्धाचे समर्थन करावे की, जीवित-मृत लोकांच्या अधिकारांचे समर्थन करावे.
५) इतिहासकाराने सरकारी किंवा इतरांचे प्रचारक व्हावे का?  असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

 भारताच्या संदर्भात आपण पुढील चर्चा केली पाहिजे. ज्या लोकांचा आपण  द्वेष करतो, तिरस्कार करतो, त्यांना विरोधक/शत्रू मानतो, त्यांच्यामुळे सगळे वाईट झाले असे समजतो त्यांच्या इतिहासाला अभ्यासात न्याय देतो का ?  हल्ली, विरोधी पक्षाचा/ विचारांचा, लोकांचा अभ्यास त्यांना खलनायक ठरविण्यासाठीच केला जातो. विरोधी गटाचा व्यक्ती आपल्या लेखनात नायक बनतच नाही.

सोमवार, १८ मे, २०२०

धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा !




कालपरवाच धार्मिक अभ्यासक असलेला व्यक्ती, धर्माला मानसिक विकार म्हणतो तर मानसिक आरोग्य क्षेत्रातील अभ्यासक धर्म हा माणसाला मानसिक आजारातून बरा करतो असे म्हटतात असे वाचले आहे. त्यामुळे धर्माची चर्चा करतांना निव्वळ बुद्धिवाद, नास्तिकता यांना केंद्रस्थानी ठेवून चर्चा करण्यापेक्षा लोकांचे सामजिक, नैतिक, भौतिक आणि मानसिक जीवन आणि धर्म यांचा काय सबंध आहे. हे पडताळून पाहिले पाहिजे. 

धर्म जीवनात पारंपरिक लोकाचार, रुढी, परंपरा ह्या सुद्धा येतात. नुसते धर्मग्रंथ येत नाहीत. धर्मजीवनाने मानवी सर्वांग बांधलेले असते. धार्मिक इतिहास (religious history), धर्माचा इतिहास (history of religion) आणि धर्माचा मानवशास्त्रीय व्यवहार (anthropology of religion) अशा वेगवेगळ्या पातळीवर धर्माचे वेगवेगळी रूपे दिसतात.

महाराष्ट्रात दि. के. बेडेकर, गं. बा. सरदार, नलिनी पंडित आणि रावसाहेब कसबे (इतरही आहेत) यांनी धर्म चिंतन, धर्म सुधारणा, आधुनिकता आणि धर्म, इहवादी शासन आणि धर्मस्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता आणि धर्मांतर ह्या विषयांवर महत्वाची चर्चा केलेली आहे.

धर्मचिकित्सा, धर्मचिंतन, धर्मनिरपेक्षता, धर्मांतर आणि धर्मविरोध यासंबधी चर्चा, वादविवाद करण्याआधी किमान वरील लोकांचे लिखाण वाचले पाहिजे म्हणजे चर्चेला, वादविवादाला एक बैठक मिळते.

शनिवार, १६ मे, २०२०

स्त्रीवाद: काही निरीक्षण,काही चिंतन!


स्त्रीवाद: काही निरीक्षण,काही चिंतन!



           कधी कधी आपण मानत असलेल्या विचारधारांचा खूपच संकुचित अर्थ लावला तर आपण स्त्रीवादी व कोणताही वादी असतांना 'माणुसकीला' मुकतो की काय असे वाटते. वैचारिक मोकळेपणा कमी झाल्याने आणि कोरडेपणा वाढल्याने हल्ली तर ह्या गोष्टी खूपच जोरधारपणे होतांना दिसत आहे. त्यामुळे सरसकटीकरण, गैरसमज, द्वेष आणि तिरस्कार  झपाट्याने वाढत आहे. एकमेकांना समजून घेत आणि समृद्ध करून माणूस होण्याचा मार्गच आंकुचित होतोय कि काय असाच प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्यासारख्या ग्रामीण भागातून शहरात आलेल्या  आणि आर्थिक-सामाजिक परिघावरून आलेल्या आणि स्त्रियांविषयी अनेक भ्रामक कल्पना, भ्रम आणि गैरसमजूती असलेल्या मुलाला (पुरुषाला) खऱ्या अर्थाने 'माणूस' होण्याची प्रेरणा स्त्रीवादाने दिली. पुरुषी अहंगंडला प्रश्नांकित करत पुरुषत्वाच्या ओझ्याखाली दबलेला ‘माणूस’ शोधण्याचे काम स्त्रीवादाने केले. हे स्त्रीवादाचे योगदान आहे म्हणून स्त्रीवाद हा तर स्त्री-पुरुषांना 'माणूस' बनवणारी विचारधारा आहे असे मला वाटते.
 
           सध्या किंवा स्त्रीवादाच्या जन्मापासूनच म्हणा हवे तर. स्त्रीवाद हा understood पेक्षा misunderstood च अधिक आहे त्यामुळे अनेक घोळ झाले आहेत आणि होत आहेत. बहुजिनसी समाजाचे अनुभवविश्व उभ्या आडव्या सत्तासंबंधांनी बनलेले असल्यामुळे अनेकांनी त्यानुसार स्त्रीवादाचा अर्थ लावला आहे आणि त्यातूनच गोरा स्त्रीवाद, काळा स्त्रीवाद, ब्राह्मणी स्त्रीवाद, दलित स्त्रीवाद, बहुजन स्त्रीवाद, पाश्चिमात्य स्त्रीवाद , पौर्वात्य स्त्रीवाद असे प्रवाह जन्माला आले आहेत.  सुरुवातीचे स्त्रीवादाचे समाजशास्त्र पाहिले तरी त्यात कोणाला स्थान नव्हते हे सहजच कळून येईल. हे कधी कळत झाले तर कधी नकळत झाले  म्हणून स्त्रीवादाला संकुचीततेची लेबलं लावावी असे मला वाटत नाही. स्त्रीवाद खाजगी हे राजकीय असे  म्हणतो, त्यावेळी स्थानिक ते वैश्विक अशा सगळ्याच राजकारणाविषयी बोलतो असे अभिप्रेत आहे. ज्या- ज्या सामाजिक-भौतिक पार्श्वभूमीतून स्त्रीवादी स्त्री-पुरुष येतात त्या पार्श्वभूमीचा त्यांच्यावर कळत नकळत प्रभाव पडतो जातो मग त्यातून कशाला प्राधान्य द्यावे आणि कशाला देवू नये याची चर्चा सुद्धा घडून येते. कधी कधी अशा चर्चाच कोणाला स्त्रीवादी म्हणावे आणि कोणाला म्हणू नये हे सुद्धा ठरवतात. बर्याचवेळा  एकीकडे संपूर्ण आयुष्य नकळत स्त्रीवादी विचारांनी आणि तत्वज्ञानांनी जगलेले स्त्री-पुरुष स्वतःला कधीही स्त्रीवादी म्हणून घेत नाही तर दुसरीकडे स्त्रीवादाचा अर्थ न समजून घेताही स्त्रीवादी असल्याचे भांडवल करत जगणारे लोक आहेत.

           स्त्रीवादाचे सुद्धा स्त्रियांवर ओझे नको, मी जीन्स घालते, आधुनिक आहे पण स्त्रीवादी नाही असे एकीकडे म्हटले जात आहे आणि त्याचवेळी समाजात अजूनही स्त्री जन्म नाकारला जातोय, स्त्रियांवर पूर्ण कपडे असतांना आणि अर्धे कपडे असतांना बलात्कार केला जातोय. आजही सगळ्यात जास्त कुटुंबातीलच पुरुषांकडून लहान मुलींवर अत्याचार होत आहेत.  अशा परस्पर विरोधी वास्तवाच्या अनेक काळांत (स्त्रियांना भोगवस्तू मानणारा प्राचीन काळ आणि स्त्रियांना व्यक्ती, माणूस मानणारा आधुनिक काळ) आपण जगत आहोत. स्त्रीवाद हा विकसित होत आला आहे त्यामुळे स्त्रीवादी चर्चेत वर्ग, जात, धर्म, वंश, राष्ट्रीयता, पर्यावरण या मुद्द्यांना घेवून घमासाम चर्चा सुद्धा झाली आहे आणि त्या चर्चेने स्त्रीवादाला मुळासकट विकसित केले आहे त्यामुळे हल्ली स्त्रीवादाचे नाव घेवून स्त्रीवादालाच बदनाम करणारे लोक खरंच स्त्रीवादी आहेत का ? हे सुद्धा आपण तपासून पाहू शकतो कारण हल्ली सोई सोईने स्त्रीवादी होण्याचा, गरजेपुरते स्त्रीवादी होण्याचे पेव सुटले आहे तसेच उठसूट स्त्रीवादाला पाश्चिमात्य अनुकरण, संस्कृतीविरोधी म्हणण्याचेही पेव सुटले आहे. भांडवलशाहीने स्त्रियांच्या केलेल्या मादीकरणाकडे आणि वस्तूकरणाकडे काना डोळा करत काही लोक भांडवलशाहीच ‘स्त्रीमुक्ती’ करू शकते असे म्हणत असतात तर आधुनिकीकरणामुळे आणि पाश्चिमात्यकरणामुळेच स्त्रिया असुरक्षित झाल्या आहेत त्यामुळे धर्म संस्कृतीचे पालन केल्याने स्त्रियांचे प्रश्न सुटतील असे म्हणत काही लोक धर्म- संस्कृतीच्या क्षेत्रात स्त्रियांना भोगवस्तू, कलंकित, अशुभ म्हणून का पहिले होते याचे उत्तर देणे टाळतात.  

          स्त्रीवादाला चूक की बरोबर किंवा काळे कि पांढरे या तर्कानुसार समजून घेता येत नाही. वैश्विक आणि स्थानिक समाज हा बहुजिनसीसमाज आहे. त्याच्यामध्ये वर्ग, वंश, धर्म, जात, राष्ट्रीयता आणि लैंगिकता यासारख्या वैविध्यांनी निर्माण केलेले भेद आहेत आणि त्यातून ‘स्त्रीप्रश्न’ नेहमी ‘घडत’ आणि ‘पुनर्घडत’ असतो. त्यामुळे त्यातील व्यामिश्रता, गुंतागुंत, वैश्विकता आणि स्थानिकता समजून घेतल्याशिवाय हा प्रश्न समजणे खूपच अवघड आहे. तोंडपाठ, पाठांतर किंवा कंठस्थ करण्यासाठी स्त्रीवाद हा नुसता विचार नाही तर हिंसेला, द्वेषाला, तिरस्काराला आणि सरसकटीकरणला नाकारत नवा माणूस घडवण्याचा व्यवहार आहे म्हणून विचारांसोबत व्यवहार खूपच महत्वाचा ठरतो.  


देवकुमार अहिरे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
devkumarahire@gmail.com


रविवार, १० मे, २०२०

जन गण मन आणि तीन कवी: नागार्जुन, गोरख पांडे आणि विद्रोही!

  
कोकणी कवी नीलबा खांडेकर म्हणतात की, ‘कविता ही सामाजिक संबंधाची पुराभिलेखागार आहे.’ (९ जाने. २०२०, द इंडियन एक्स्प्रेस)  

स्वातंत्र्योत्तर भारतात भूख, गरिबी, अत्याचार आणि शोषणापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडणारे तीन जनकवी  म्हणजे नागार्जुन (1911- 1998), गोरख पांडे (1945 – 1989) विद्रोही  (1957 -  2015). तिन्ही कवींनी ‘जन गण मनच्या अधिनायका’ला आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रश्न विचारले आहेत.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनात अनेकांनी स्वातंत्र्योत्तर भारतात ‘कामगार-शेतकऱ्यांचे राज्य’ येईल, ‘ग्रामस्वराज्य’ येईल आणि जातिमुक्त नवा भारत निर्माण होईल अशी स्वप्ने पाहिली होती. परंतु, ज्यावेळी स्वातंत्र्याचा काळ नजीक आला तेंव्हा अनेकांना असे कळून चुकले होते की, ‘इंग्रजांचे राज्य जाऊन येथे बनिया- भांडवलदारांचे राज्य येनार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनात पाहिलेल्या स्वातंत्र्याचे गरिबी, भूख, शोषण आणि अत्याचारमुक्तीचे स्वातंत्र्य हे एक दिवास्वप्नच ठरले. अशा पार्श्वभूमीमुळेच नागार्जुन, गोरख पांडे आणि विद्रोही यांच्या सारख्या राजकीय जनकवींचा जन्म झाला.

स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक संबंधांचे वास्तवदर्शी चित्रण या तिन्ही कवींच्या कविता दाखवतात. स्वातंत्र्योत्तर राज्यसंस्थेचे वर्गीय चरित्र समजून घेण्यासाठी सुद्धा या कवींच्या कविता अत्यंत महत्वाच्या आहेत.  

१.  नागार्जुन ची कविता!

मलाबार के खेतिहरों को अन्न चाहिए खाने को,
डंडपाणि को लठ्ठ चाहिए बिगड़ी बात बनाने को!
जंगल में जाकर देखा, नहीं एक भी बांस दिखा!
सभी कट गए सुना, देश को पुलिस रही सबक सिखा!

जन-गण-मन अधिनायक जय हो, प्रजा विचित्र तुम्हारी है
भूख-भूख चिल्लाने वाली अशुभ अमंगलकारी है!
बंद सेल, बेगूसराय में नौजवान दो भले मरे
जगह नहीं है जेलों में, यमराज तुम्हारी मदद करे।

ख्याल करो मत जनसाधारण की रोज़ी का, रोटी का,
फाड़-फाड़ कर गला, न कब से मना कर रहा अमरीका!
बापू की प्रतिमा के आगे शंख और घड़ियाल बजे!
भुखमरों के कंकालों पर रंग-बिरंगी साज़ सजे!

ज़मींदार है, साहुकार है, बनिया है, व्योपारी है,
अंदर-अंदर विकट कसाई, बाहर खद्दरधारी है!
सब घुस आए भरा पड़ा है, भारतमाता का मंदिर
एक बार जो फिसले अगुआ, फिसल रहे हैं फिर-फिर-फिर!

छुट्टा घूमें डाकू गुंडे, छुट्टा घूमें हत्यारे,
देखो, हंटर भांज रहे हैं जस के तस ज़ालिम सारे!
जो कोई इनके खिलाफ़ अंगुली उठाएगा बोलेगा,
काल कोठरी में ही जाकर फिर वह सत्तू घोलेगा!

माताओं पर, बहिनों पर, घोड़े दौड़ाए जाते हैं!
बच्चे, बूढ़े-बाप तक न छूटते, सताए जाते हैं!
मार-पीट है, लूट-पाट है, तहस-नहस बरबादी है,
ज़ोर-जुलम है, जेल-सेल है। वाह खूब आज़ादी है!

रोज़ी-रोटी, हक की बातें जो भी मुंह पर लाएगा,
कोई भी हो, निश्चय ही वह कम्युनिस्ट कहलाएगा!
नेहरू चाहे जिन्ना, उसको माफ़ करेंगे कभी नहीं,
जेलों में ही जगह मिलेगी, जाएगा वह जहां कहीं!

सपने में भी सच न बोलना, वर्ना पकड़े जाओगे,
भैया, लखनऊ-दिल्ली पहुंचो, मेवा-मिसरी पाओगे!
माल मिलेगा रेत सको यदि गला मजूर-किसानों का,
हम मर-भुक्खों से क्या होगा, चरण गहो श्रीमानों का!


२. गोरख पांडे ची कविता!

जन गण मन अधिनायक जय हे !

जय हे हरित क्रांति निर्माता
जय गेहूँ हथियार प्रदाता
जय हे भारत भाग्य विधाता
अंग्रेजी के गायक जय हे !

जन गण मन अधिनायक जय हे ! 

जय समाजवादी रंगवाली
जय हे शांतिसंधि विकराली
जय हे टैंक महाबलशाली
प्रभुता के परिचायक जय हे !

जन गण मन अधिनायक जय हे ! 
जय हे जमींदार पूँजीपति
जय दलाल शोषण में सन्मति
जय हे लोकतंत्र की दुर्गति
भ्रष्टाचार विधायक जय हे !

जन गण मन अधिनायक जय हे

जय पाखंड और बर्बरता
जय तानाशाही सुंदरता
जय हे दमन भूख निर्भरता
सकल अमंगलदायक जय हे!

जन गण मन अधिनायक जय हे

३. विद्रोही ची कविता!

मैं भी मरूंगा
और भारत के भाग्य विधाता भी मरेंगे
लेकिन मैं चाहता हूं
कि पहले जन-गण-मन अधिनायक मरें
फिर भारत भाग्य विधाता मरें
फिर साधू के काका मरें
यानी सारे बड़े-बड़े लोग पहले मर लें
फिर मैं मरूं- आराम से
उधर चल कर वसंत ऋतु में
जब दानों में दूध और आमों में बौर आ जाता है
या फिर तब जब महुवा चूने लगता है
या फिर तब जब वनबेला फूलती है
नदी किनारे मेरी चिता दहक कर महके
और मित्र सब करें दिल्लगी
कि ये विद्रोही भी क्या तगड़ा कवि था
कि सारे बड़े-बड़े लोगों को मारकर तब मरा॥


फ्रांत्ज फेनन: जीवन, कार्य आणि तत्वज्ञान

  उत्तर वासाहतिक समाजांमध्ये निर्वासाहतीकरणाची चळवळ अलीकडे जगभरात सुरु झालेली आहे . राजकरण , भाषा , संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये ...